🛡 *★08. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ९८ वा (लीप वर्षातील ९९ वा) दिवस आहे.
~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९२९ : भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
●१८३८ : ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे चे ७ वे प्रधान सचिव
◆१९२८ : रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार
◆१९२४ : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’कुमार गंधर्व’
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान
●१९७३ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार
●१९२२ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक
●१८९४ : *बंकिमचंद्र चट्टोपाध्याय* – कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली.
●१८५७ : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आले.
(जन्म: १९ जुलै १८२७)