थोरव्यक्ती परिचय🔶*08 एप्रिल *❒ बंकिमचंद्र चटोपाध्याय ❒

🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
बंकिमचंद्र यादवचंद्र चटोपाध्याय

08 एप्रिल बंकिमचंद्र चटोपाध्याय  पुण्यतिथी 
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
जन्म नाव :~ बंकिमचंद्र यादवचंद्र
                      चटोपाध्याय
जन्म :~ २६ जून १८३८
*मृत्यू :~ ८ एप्रिल १८९४*
कार्यक्षेत्र :~ कवी, कादंबरीकार, पत्रकार, डेप्युटी मॅजिस्ट्रेट (पेशा)
*प्रसिद्धसाहित्य:~वंदे मातरम् हे गीत*
    प्रभावित भारतीय स्वातंत्र्यलढा

         ★बंकिमचंद्र चटोपाध्याय★
     हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

            ◆वन्दे मातरम्◆
     वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीत हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.

    भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिग, चंद्रशेखर आजाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. 

       ◆प्रकाशित साहित्य ◆
कादंबऱ्या :~ दुर्गेशनन्दिनी (१८६५), कपालकुण्डला, मृणालिनी (१८६९), इन्दिरा, आनंदमठ (१८८२) इत्यादी,

    वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वाङ्‌मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे.

निबंध :~ लोकरहस्य (१८७४), बिज्ञान रहस्य (१८७५), कमलाकान्तेर दप्तर (१८७५), बिबिध समालोचना (१८७६), साम्य (१८७९), कृष्णचरित्र (१८८६), धर्मतत्त्ब अनुशीलन, श्रीमद्भगबद्गीता (१९०२) इत्यादी.

No comments:

Post a Comment

Elements And Their Symbols

मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा. Elements And Their Symbols  अनु क्र. नाव           सूत्र 1. हायड्रोजन (Hydrogen)-H 2. हेलियम (...