नारो बापूजी मुगदल
"नारो बापूजी मुगदल" यांचे बलिदान.
६ जानेवारी ते ९ जानेवारी १६६४ पर्यंत मराठ्यांनी "सुरत" मनसोक्त लुटली होती. सुरत लुटीची लक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोचले. पण शहाजीराजेंच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले. लुटीचा मार्ग काढत मुघल हेर लोहगडच्या आवारात पोचले आणि मुघल सरदार मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने चालून आला.
त्याला अडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा बालसवंगडी "नारो बापूजी मुगदल" पुढे गेले. नारो बापूजी हे "श्रीपाद बापूजी मुगदल" यांचे पुत्र.
"वडगाव मावळ" जवळ नारो बापूजी व मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला.
मुघलांकडे अनेक घोडेस्वार व तिरंदाज आणि बंदूकधारी सैन्य होते तरीसुद्धा मराठ्यांच्या गनिमी काव्यासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नंगी तलवार अशी काही चालवत होते की मुघलांची धांदल उडाली.
शेवटी एका तिरंदाजाचा बाण नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.
No comments:
Post a Comment